महाराष्ट्र ग्रामीण

UPSC 2025 : मेंढपाळाचा मुलगा बनला IPS अधिकारी? गुर वळणारा पोरगा आज साहेब झाला! वाचा प्रेरणादायी यशकथा April 25, 2025 by MS Marathi

2025 च्या UPSC सिव्हिल सेवा परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या छोट्याशा गावातील बिरदेव सिद्धप्पा ढोणे यांनी मोठे यश मिळवले आहे. त्यांना परीक्षेत 551 वा क्रमांक मिळाला असून आता ते IPS अधिकारी होण्याची शक्यता आहे. त्यांची यशकथा म्हणजे जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचे सर्वोत्तम उदाहरण आहे.

WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
शैक्षणिक पार्श्वभूमी
बिरदेव यांचे शिक्षण एका अत्यंत साध्या कुटुंबातून सुरू झाले. त्यांचे वडील मेंढपाळ म्हणून मेंढ्या राखण्याचे काम करतात, तर त्यांची आई शेतमजुरी करते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असूनही त्यांनी शिक्षणाची नाळ सोडली नाही. जेव्हा upsc चा निकाल लागला त्यावेळेस बिरुदेव मेंढ्या संभाळत होते.

बिरुदेव यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतले तसेच माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (COEP) मधून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतली

नोकरी आणि UPSC चा प्रवास
पदवी घेतल्यानंतर त्यांनी भारतीय टपाल विभागात ‘पोस्टमन’ म्हणून नोकरी स्वीकारली. मात्र त्यांच्या मनात UPSC ची तयारी करून काहीतरी मोठं करायचं होतं. मग त्यांनी UPSC साठी तयारी सुरू केली आणि पोस्टमनची नोकरी राजीनामा देऊन सोडली. पुढील अभ्यास कामासाठी त्यांनी दिल्लीमध्ये राहून तीन वेळा UPSC ची तयारी केली.

हलाखीची परिस्थिती होती, अनेक अडी अडचणी असूनही त्यांनी हार मानली नाही, त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात अखेर 551 वा क्रमांक मिळवून यश प्राप्त केले.

परिवाराची आणि गावाची भूमिका
UPSC चा निकाल लागल्यावर बिरदेव मेंढ्या राखत होते. त्यांना त्यांच्या मित्राकडून न�

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button