Uncategorized
Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
मुख्यमंत्र्यांचा

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांची आझाद मैदानात भेट घेतल्यानंतर अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव आणला आणि राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
Shaktipeeth Expressway : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकरी एकवटले. यावेळी हजारो शेतकऱ्यांनी निर्धाराने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा नारा दिला. दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांची आझाद मैदानात भेट घेतल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव आणला आणि राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.